विक्रमांसाठी नव्हे तर पदकांसाठी धावलो, धावपटू युसेन बोल्टचे उद्गार

300

जमैकाचा महान धावपटू युसेन बोल्टने आपल्या यशाचे रहस्य शनिवारी उलगडले आहे. तो यावेळी म्हणाला, ऑलिम्पिक सुवर्ण पदक हे माझ्यासाठी नेहमीच स्पेशलठरले आहे. प्रतिष्ठेचे पदक मिळवण्यासाठी धाव धाव धावलो. विक्रमांच्या मागे धावलो नाही.

स्पर्धा जवळ येत असताना निर्माण झालेला उत्साह, स्टेडियममधील क्रीडाप्रेमींकडून मिळणारा प्रतिसाद या सर्व गोष्टींची आठवण येतेच, मात्र माझा निवृत्तीचा निर्णय योग्य आहे. कोणताही पश्चात्ताप झालेला नाही. निवृत्तीनंतर इतर प्रोजेक्टला वेळ देता येतो आहे, असे युसेन बोल्ट स्पष्टपणे म्हणाला.

आपली प्रतिक्रिया द्या