रुणवाल फाऊंडेशनची पुरग्रस्तांना 50 लाखांची मदत, जीवनावश्यक वस्तू, नवे कपडे पुरवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
सर्व छायाचित्रे- सुनील उंबरे

कोरोना काळात निर्बंधांमुळे अडकून पडलेल्या लोकांना जेवणासह इतर मदत करणाऱया रुणवाल फाऊंडेशनने आता राज्यातील पूरग्रस्तांसाठीही पुढाकार घेतला असून त्यांना जीवनावश्यक वस्तू आणि नव्या कपडय़ांच्या स्वरूपात तब्बल 50 लाखांची मदत केली आहे. रुणवाल फाऊंडेशन ही रुणवाल ग्रुप या बांधकाम क्षेत्रातील मानांकित कंपनीसाठी सामाजिक संस्था आहे.

कोरोनाची दुसरी लाट सुरू असतानाच राज्यात अतिवृष्टीमुळे कोकण आणि पश्मि महाराष्ट्राला महापुराचा दणका बसला. कोकणातील चिपळूण, खेड, पोलादपूर या भागाला मोठा फटका बसला. या पार्श्वभूमीवर, सरकारची युद्धपातळीवर मदत सुरू असतानाच रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. त्याला तात्काळ प्रतिसाद देत रुणवाल फाऊंडेशनने नवे कपडे आणि जीवनावश्यक वस्तूंचा एक ट्रक पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पाठवला. त्याचबरोबर गाळ. चिखल हटवण्यासाठी फावडे तसेच इतर साहित्यही पाठवले.

दरम्यान, सरकार तातडीन पूरग्रस्तांना मदत करतच आहे. मात्र, त्याचबरोबर रुणवाल फाऊंडेशनसारख्या सामाजिक संस्थांकडून मदत आली तर त्यामुळे लोकसहभाग वाढून लोकांना अधिक लवकर दिलासा मिळेल, असा विश्वास रुग्णवाल फाऊंडेशनचे अध्यक्ष सुभाष रुणवाल यांनी व्यक्त केला.