
सामना प्रतिनिधी । मुंबई
कचरा उचलणाऱ्या गाड्या अचानक 20 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाच्या चांगलाच अंगलट आल्यानंतर आता मागणीनुसार संबंधित सर्व विभागांत गाड्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली मुंबईची कचराकोंडी फुटणार आहे. याबाबत दैनिक ‘सामना’मध्ये मंगळवारीच बातमी प्रसिद्ध झाली होती. या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाने घेतलेल्या निर्णयामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.
पालिका क्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापन प्रभावीपणे केल्यामुळे मुंबईत दररोज जमा होणाऱया कचऱयाचे प्रमाण नऊ हजार मेट्रिक टनांवरून 7 हजार 200 मेट्रिक टनांवर आल्याचे पालिकेने जाहीर केले. यामुळे कचरा वाहून नेणाऱया गाडय़ांमध्ये 20 टक्के कपातही करण्यात आली, मात्र प्रत्यक्षात हा कचरा कमी झालाच नसल्याचे प्रत्यक्ष काम करणारे कर्मचारी सांगत आहेत. कचरा कमी झाल्याचे सांगत गाडय़ा कमी केल्याने संपूर्ण मुंबईत कचऱयाचे ढीग साचले आहेत. गाडय़ा कमी केल्यामुळे ही स्थिती ओढवली असताना कचऱयाचे ढीग दिसत असल्यामुळे कामगार आणि ज्युनियर अधिकाऱयांना पालिका प्रशासनाकडून मेमो देण्याचे प्रकार सुरू झाल्यामुळे कामगारांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेने गाडय़ा वाढवण्याचा निर्णय घेतल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
या विभागात वाढवल्या गाडय़ा
संतप्त कामगारांनी सोमवारी माटुंगा विभाग कार्यालयावर धडक दिली होती. या पार्श्वभूमीवर आज पालिका अधिकाऱयांनी बैठक घेऊन ‘ई’ विभाग-भायखळा , ‘एफ उत्तर’ माटुंगा व ‘एम पूर्व’ मानखुर्द-गोवंडी या तीन विभागांमध्ये गाडय़ा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला.
त्याचबरोबर ‘आर मध्य’, ‘आर उत्तर’ व ‘आर दक्षिण’ या तीन विभागांमध्ये कचरा उचलण्यापासून ते क्षेपणभूमीपर्यंत काहून नेण्याचे कंत्राट देण्यात आले असून याबाबतची प्रत्यक्ष कार्यवाही आजपासून कंत्राटदारामार्फत सुरू करण्यात आली आहे. यामुळे घनकचरा व्यवस्थापन प्रभावीपणे होणार असल्याचे घनकचरा व्यवस्थापन खात्याचे उपायुक्त विश्वास शंकरवार यांनी सांगितले.
वाहनांच्या फेऱया वाढवल्या
वाढवण्यात आलेल्या गाडय़ांमध्ये प्रत्येक फेरी दरम्यान 6 टन कचरा वहन क्षमता असणारे मोठे कॉम्पॅक्टर व 2.5 टन कचरा वहन क्षमता असणाऱया छोटे कॉम्पॅक्टर यांचा समावेश आहे.
‘ई’ विभागात यापूर्वी मोठय़ा कॉम्पॅक्टरच्या 13 फेऱया होत असत. ही संख्या वाढवून आता 17 करण्यात आली. याव्यतिरिक्त छोटय़ा कॉम्पॅक्टरच्या 25 फेऱयादेखील घनकचरा व्यवस्थापनासाठी उपयोगात येत आहे.
‘एफ उत्तर’ विभागात यापूर्वी मोठय़ा कॉम्पॅक्टरच्या 16 फेऱया तर छोटय़ा कॉम्पॅक्टरच्या 12 फेऱया होत असत. ही संख्या वाढवून आता मोठय़ा कॉम्पॅक्टरच्या 20 फेऱया तर छोटय़ा कॉम्पॅक्टरच्या 15 फेऱया या अशी करण्यात आली आहे.
‘एम पूर्व’ विभागात यापूर्वी मोठय़ा कॉम्पॅक्टरच्या 23 फेऱया तर छोटय़ा कॉम्पॅक्टरच्या 16 फेऱया होत असत. ही संख्या वाढवून आता मोठय़ा कॉम्पॅक्टरच्या 27 फेऱया तर छोटय़ा कॉम्पॅक्टरच्या फेऱया अशी करण्यात आली आहे.
पालिका क्षेत्राच्या शहर विभागातील ‘ए’, ‘बी’, ‘सी’, ‘डी’, ‘इ’, ‘एफ दक्षिण’, ‘एफ उत्तर’, ‘जी उत्तर’ असे आठ विभाग आणि पूर्व उपनगरांमधील ‘एम पूर्व’ व ‘एम पश्चिम’ या दोन अशा एकूण दहा विभागांमध्ये कचरा वाहून नेणारी वाहने भाडेतत्त्वावर घेण्याचे सात वर्षांसाठीचे कंत्राट 1 नोव्हेंबर 2018 पासून सुरू झाले आहे.
‘आर दक्षिण’, ‘आर मध्य’ व ‘आर उत्तर’ या तीन विभागांमध्ये कचरा उचलण्यापासून ते क्षेपणभूमीपर्यंत काहून नेण्यापर्यंतचे ‘टर्न की कॉन्ट्रक्ट’ देण्यात आले आहे. या कंत्राटाची कार्यवाही आज 13 नोव्हेंबर 2018 पासून सुरू झाली आहे.
























































