शबरीमाला वाद- महिला उभारणार 620 किलोमीटर मानवी भिंत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
shabrimala-1

सामना ऑनलाईन। कोच्ची

सर्वोच्च न्यायालयाने महिलांना शबरीमाला मंदिरात स्वामी अयप्पा यांच्या दर्शनाची परवानगी दिलेली असतानाही अद्यापपर्यंत एकही महिला मंदिरात प्रवेश करू शकलेली नाही. मंदिर प्रशासन व अनेक हिंदू संघटनांबरोबरच महिलाही महिलांच्या मंदिर प्रवेशास विरोध करत आहेत. यामुळे केरळमधील लाखो महिला एकत्र आल्या असून या विरोधाचा निषेध करण्यासाठी त्या 620 किलोमीटर लांब मानवी भिंत उभारणार आहेत.

केरळच्या उत्तरेकडील कसोरगोडपासून दक्षिण भागातील तिरुवनंतपुरम जिल्ह्यापर्यंत ही भिंत उभारण्यात येणार आहे. कसोरगोडच्या आरोग्य मंत्री श्यालजा या मानवी भिंतीचे प्रतिनिधित्व करणार आहेत. तर तिरुवनंतपुरम येथे माकपाच्या नेत्या वृंदा करात मानवी भिंतीचे प्रतिनिधित्व करणार आहेत. मंगळवारी तीन वाजल्यापासून या भागांमध्ये महिला एकत्र येतील. त्यानंतर चार वाजल्यापासून सव्वा चार वाजेपर्यंत ही भिंत उभारण्यात येणार आहे.