एमपीतील खेडेगावात अचानक प्रकटला सचिन तेंडुलकर; म्हणाला, आज वडील जीवंत असते तर…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

क्रिकेटचा देव आणि ‘भारतरत्न’ सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याने आज मध्य प्रदेशमधील देवास जिल्ह्यातील संदलपूर येथे भेट दिली. सचिनचा हा दौरा अत्यंत गोपनीय ठेवण्यात आला होता. एका एनजीओच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी तो आला होता. अचानक गावामध्ये सचिन प्रकट झाल्यामुळे लोक अचंबित झाले आणि त्यानंतर त्याच्या गाड्यांच्या ताफ्यामागे धावू लागले. लोकांना आपल्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. त्यामुळे प्रचंड गर्दी झाली होती. सचिन येणार म्हणून येथे पोलिसांनी सुरक्षाव्यवस्था कडक ठेवली होती.

संदलपूर येथे पोहण्यासाठी सचिनच्या गाड्यांच्या ताफा इंदूरहून निघाला. गाड्यांचा ताफा बागली येथून गेला तेव्हा लोकांना आपल्या डोळ्यावर विश्वास बसला नाही. यानंतर लोकं सचिनच्या गाडीमागे धावू लागले. अखेर देवास जिल्ह्यातील अखेरच्या टोकावर असणाऱ्या संदलपूर येथे पोहोचला, मात्र याची माहिती स्थानिक लोकांना नव्हती. आपल्या संस्थेमार्फत केलेली कामे पाहण्यासाठी सचिन या ठिकाणी आला होता.

संदलपूरजवळ परिवास एज्युकेशन सोसायटी नावाची एक एनजीओ आपली इमारत उभारत आहे. कामामध्ये झालेली प्रगती पाहण्यासाठी सचिन येथे पोहोचला होता. यासाठी सचिनच्या संस्थेने आर्थिक हातभार लावला आहे. याबाबत वृत्त प्रसारित झाल्यानंतर शिक्षणासाठी फंड द्यावा अशी माझ्या वडिलांची इच्छा होती, असे सचिनने सांगितले. आज वडील असते तर त्यांना खूप आनंद झाला असता, असेही तो म्हणाला.

2300 मुलांच्या शिक्षणासाठी फंड

सचिनची संस्था 2300 मुलांच्या शिक्षणाचा भार उचलत आहे. यासाठी ही संस्था फंड उपलब्ध करून देत आहे. ही आपल्या वडिलांची इच्छा होती असे सचिनने सांगितले.