
सामना प्रतिनिधी । मुंबई
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना एकाधिकारशाही नडली. त्यांच्या एकाधिकारशाही विरोधात शेतकऱयांनी मतदान केल्यानेच हातकणंगले मतदारसंघात त्यांचा पराभव झाला, अशी टीका राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज केली.
लोकसभा निवडणुकीत महायुतीला दणदणीत यश मिळाल्याबद्दल सदाभाऊ खोत यांनी आज ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. त्यानंतर खोत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राजू शेट्टी यांच्या पराभवाबद्दल खोत यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले की, पक्षामध्ये एकाधिकारशाही आणणाऱया शेट्टी यांना शेतकरी आणि बहुजनांनी नाकारले.



























































