‘सह्याद्री’तील फॉल सिलिंग कोसळले, कर्मचाऱयांच्या प्रसंगावधानाने अनर्थ टळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सह्याद्री अतिथीगृहाच्या सभागृहाजवळील फॉलसिलिंग आज सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास कोसळले. सभागृहाबाहेर असलेल्या कारंज्यांवरच हे फॉलसिलिंग कोसळले. सुदैवाने वेळीच ही बाब लक्षात आल्याने हा परिसर रिकामी करण्यात आला व कुणालाही इजा झाली नाही.

सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास सभागृहासमोर असलेल्या समिती कक्षात पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांची मीटिंग सुरू होती. त्याचवेळी लाकडी फॉलसिलिंगचा कर्रकर्र आवाज येऊ लागला होता. व एक बाजू थोडी खाली आली. तेथील कर्मचाऱयांनी सावधगिरीची उपाययोजना म्हणून आदित्य ठाकरे यांना याची सूचना दिली. तत्काळ येथील जागा रिकामी करण्यात आली. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे हे तेथून गेल्यानंतर पाच ते सहा मिनिटांनी हे फॉलसिलिंग कोसळले. पीडब्लूडीच्या अधिकाऱयांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत येथील नुकसानीची पाहणी करून दुरुस्तीच्या कामास सुरुवात केली.

उच्चस्तरीय चौकशाची मागणी

सह्याद्री अतिथीगृह येथील छत कोसळते ही धक्कादायक बाब आहे. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे व बरोबरचे सर्व कर्मचारी सुखरूप आहेत हे महत्त्वाचे. तरी या बांधकामाची व या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी डॉ. नीलम गोऱहे यांनी केली आहे.