
हिंदुस्थानची फुलराणी म्हणून प्रचलित असणारी प्रसिद्ध टेनिसपटू सायना नेहवाल आणि तिचा पती पारुपल्ली कश्यप यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत तिने याची माहिती दिली. बराच विचार केल्यानंतर दोघांनी मिळून विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याचा तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
देशाच्या दोन माजी अव्वल बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांनी त्यांच्या सात वर्षांच्या वैवाहिक जीवनानंतर विभक्त होण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या जोडप्याने 2018 मध्ये लग्न करून त्यांच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती. मात्र आता त्यांनी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.
सायना नेहवालने रविवारी सोशल मीडियावर एका भावनिक पोस्टद्वारे ही माहिती शेअर केली. तिने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, “कधी कधी आयुष्य आपल्याला वेगवेगळ्या दिशेने घेऊन जाते. खूप विचार आणि चर्चेनंतर मी आणि पारुपल्ली कश्यप यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही शांतता, वैयक्तिक वाढ आणि एकमेकांसाठी चांगल्या भविष्याचा मार्ग निवडला आहे. आमच्या एकत्रित आठवणींसाठी मी कृतज्ञ आहे आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देते. या काळात आमच्या गोपनीयतेचा आदर करावा, अशी विनंती आहे.”