संत ग्रंथ पुरस्कार योजना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

कोल्हापूर जिल्ह्यातील रंकाळा येथील संत गाडगे महाराज अध्यासन केंद्राच्या वतीने राज्य पातळीवर संत ग्रंथ पुरस्कार योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेत संतचरित्र, कथा, कादंबरी, काव्य, संशोधन आणि संकीर्ण ग्रंथाचा समावेश असेल. 1 जानेवारी 2020 ते 30 डिसेंबर 2021 या कालावधीत प्रकाशित झालेल्या संत ग्रंथांच्या दोन प्रती 31 डिसेंबरपर्यंत पाठवायच्या आहेत. पुरस्कारप्राप्त संत ग्रंथांना रोख रुपये एक हजार, सन्मानपत्र देण्यात येईल असे अध्यासनाचे अध्यक्ष प्राचार्य रा. तु. भगत यांनी स्पष्ट केले. पत्ता- संत गाडगे महाराज अध्यासन, शिवसुंदर, मोहिते पार्क, रंकाळा (प.), कोल्हापूर – 416011.