महानंद डेअरीला हिवाळा मानवला, 50 हजार लिटरने दुधाची विक्री वाढली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

महानंद डेअरीला हिवाळा चांगलाच मानवला आहे. सध्या महानंदच्या दुधाची विक्री 50 हजार लिटरने वाढली आहे. सध्या राज्यभरात महानंदच्या दुधाची एकूण विक्री दोन लाख 75 हजार लिटरपर्यंत वाढल्याचे डेअरीचे व्यवस्थापकीय संचालक घनश्याम मंगळे यांनी सांगितले. दरम्यान, महानंदने आपल्या दुधात व्हिटॅमीन ए आणि डीचे प्रमाण एफएसएसएआयच्या निर्देशानुसार वाढवल्याने दुधाची गुणवत्ता वाढली आहे. त्यामुळे विक्रीतही वाढ होईल, असे त्यांनी सांगितले.