
पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी आपले नामाकंन दाखल करण्यासाठी जाताना बैलगाडीतुन प्रवास केला. तर नामाकंन दाखल करुन परतताना चक्क ऑटो रिक्षातुन घरी परतले.
निलंगा येथील शिवाजी विद्यालयाच्या मैदानावर मतदारसंघातील मतदारांचा जनआशिर्वाद घेऊन संभाजीराव पाटील निलंगेकरांनी शेतकर्यांच्या बैलगाडीतुन उपविभागीय कार्यालय गाठले. तेथे उपविभागीय अधिकारी विकास माने यांच्याकडे संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकुर्ती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी त्यांच्यासोबत मातोश्री रुपाताई पाटील निलंगेकर ,खासदार सुधाकर श्रंगारे, अँड संभाजी पाटील,चेअरमन दगडु सोळुंके, समाजकल्याण सभापती संजय दोरवे उपस्थित होते


































































