
दक्षिण कोरियन कंपनी सॅमसंगने आपल्या मिड रेंज स्मार्टफोनची किंमत कमी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीने आपल्या Galaxy A21s स्मार्टफोनची किंमत कमी केली आहे. किंमत कमी झाल्यानंतर या फोनची प्रारंभिक किंमत 13,999 रुपये इतकी झाली आहे. आज आपण याच स्मार्टफोनबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत.
Galaxy A21s मध्ये 6.5 इंचाचा infinity-O डिस्प्ले असून 5,000 mAh क्षमतेची दमदार बॅटरी आहे. ही बॅटरी 21 तासांचा व्हिडिओ प्ले-बॅक सपोर्ट देते असा कंपनीचा दावा आहे. याशिवाय या फोनमध्ये Exynos 850 चिपसेट असून AI पॉवर्ड गेम बूस्टर 2.0 दिले आहे. या फोनमध्ये 128GB इंटर्नल स्टोरेज असून 512GB पर्यंत स्टोरेज वाढवता येऊ शकते.
कॅमेरा
या स्मार्टफोनमध्ये मुख्य कॅमेरा 48 मेगापिक्सलचा आहे. तर, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड लेंस आणि 2-2 मेगापिक्सलचे अन्य दोन कॅमेरे आहेत. याशिवाय सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या पुढील बाजूला 13 मेगापिक्सलचा कॅमेराही आहे.
किंमत
कंपनीने या स्मार्टफोनची किंमत कमी केल्यानंतर याच्या 4 जीबी रॅम + 64 जीबी व्हेरिएंटची किंमत 13,999 रुपये इतकी झाली आहे. तर याच्या 6 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 14,999 रुपये इतकी झाली आहे.



























































