93 महिलांची हत्या करणाऱ्या अमेरिकन सीरियल किलरचा तुरुंगात तडफडून मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेतील खतरनाक सीरियल किलर सॅम्युअल लिटील याचा तुरुंगात तडफडून मृत्यू झाला आहे. 30 वर्षांत देहविक्रय करणाऱ्या 93 महिलांचा बळी घेणाऱ्या सॅम्युअलला मधुमेह, हृदयरोग व इतर आजारांनी त्रस्त केले होते. सॅम्युअल हा अनेक हत्यांच्या प्रकरणी दोषी आढळल्यानंतर 2014 पासून तुरुंगात होता. त्याची प्रकृती बरी नसल्यामुळे त्याला कॅलिफोर्नियातील रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र  तिथेच त्याच्यावर मृत्यूने झडप घातली. हत्यांप्रकरणी सुरू असलेल्या चौकशीत त्याने आरोपांचा इन्कार केला होता. पोलिसांनी अनेकदा त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली होती. जवळपास 700 तासांच्या चौकशीनंर लिटीलने आपल्या दुष्कृत्यांची कबुली दिली. यामध्ये अनेक हत्या प्रकरणांचा उलगडा झाला. लिटीलने 1970 ते 2015 च्या दरम्यान 93 जणांची हत्या केली असल्याची कबुली दिली. सॅम्युअलने बहुतांशी हत्या या फ्लोरिडा आणि दक्षिण कॅलिफोर्नियात केल्याचे समोर आहे.