
कोरोनाबाधित रुग्णाला उपचारासाठी पुण्याला घेऊन निघालेली रुग्णवाहिका रुग्णासह पळवून नेल्याची घटना संगमनेर तालुक्यातील घारगाव शिवारात सोमवारी रात्री घडली आहे. दरम्यान, घारगाव पोलिसांनी काही तासांतच रुग्णवाहिका पळविणाऱ्याला अटक केली आहे. रुग्णवाहिका पळवण्याचे कारण मात्र अद्यापि समजलेले नाही. वैभव सुभाष पांडे (रा. जवळे बाळेश्वर, ता. संगमनेर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून, त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.


























































