
संगीतोपचार तज्ज्ञ व एनएलपी प्रॅक्टिशनर मारुती साळुंखे यांनी ‘संगीत अंकुर’ या नावाने म्हणजेच ‘अंकुरणाऱ्या बालमनावर सांगीतिक संस्कार’ या कार्यशाळेचे आयोजन केले आहे. येत्या 21 जूनपासून या कार्यशाळेची सुरुवात होणार आहे. ऑनलाइन पद्धतीने ही कार्यशाळा पार पडणार आहे. या कार्यशाळेत विविध सांगीतिक कृतींबरोबरच, सांगीतिक खेळ, सांगीतिक चित्रकला, धडा तसेच कविता, गणिताची सूत्रे, पाढे यांचे संगीताच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. कराड येथील शिक्षण जोतिराम साळी, प्रदीप कुंभार, विजयकुमार शिंगण, ज्ञानेश्वर कल्याणकर यांच्या प्रयत्नांनी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.


























































