संगीत नाटक अकादमीच्या माजी अध्यक्ष लीला सॅमसन यांच्यावर गुन्हा

388

संगीत नाटक अकादमीच्या माजी अध्यक्षा ‘पद्मश्री’ लीला सॅमसन यांच्यावर सीबीआयने आज गुन्हा दाखल केला आहे. चेन्नई येथील कलाक्षेत्र फाऊंडेशनच्या कुथामबालम ऑडिटोरिअमच्या नूतनीकरणाच्या कामात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा ठपका सीबीआयने त्यांच्यावर ठेवला आहे.

कुथामबालम ऑडिटोरिअमच्या नूतनीकरणासाठी तब्बल सात कोटी दोन लाख रुपये एवढा निधी प्रस्तावित असताना त्यापेक्षा 62 लाख रुपये जादा खर्च केले आहेत. याबाबत केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या दक्षता अधिकाऱयाने सीबीआयकडे तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी कलाक्षेत्र फाऊंडेशनच्या माजी अध्यक्षा म्हणून सीबीआयने सॅमसन यांच्यासह फाऊंडेशनचा मुख्य लेखा अधिकारी टी. एस. मीर्ती, लेखा अधिकारी एस. रामचंद्रन, व्ही. श्रीनिवासन यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनच्या अध्यक्षपदी त्या होत्या.

आपली प्रतिक्रिया द्या