
सांगली जिह्यातील सावळजच्या मंडप व्यावसायिकाने भंगारात विकलेली लोखंडी खुर्ची चक्क इंग्लंडच्या मंचेस्टर शहरातील एका रेस्टॉरंटमध्ये ठेवलेली आहे. एका खुर्चीचा सांगली ते मँचेस्टर प्रवास कसा रंगला, याची चर्चा एका व्हिडीओमुळे चांगलीच रंगली आहे.
ज्येष्ठ क्रीडा विश्लेषक सुनंदन लेले यांनी नुकताच एक व्हिडीओ ट्विट केला. मँचेस्टरमध्ये फिरत असताना त्यांना एका रेस्टॉरंटच्या परिसरात एक लोखंडी खुर्ची दिसली. या खुर्चीच्या मागे ‘बाळू लोखंडे, सावळज’ असं नाव लिहिलेले आहे. सुनंदन लेले यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला. काही तासांतच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. सावळज येथील मंडप व्यावसायिक बाळू लोखंडेंची खुर्ची इंग्लंडमध्ये कशी पोहोचली याबाबत नेटकऱयांनी मजेशीरपणे तर्पवितर्प लढवायला सुरुवात केली. काहींनी खुर्चीचे मालक बाळू लोखंडे यांच्याशी संपर्क साधला.
Altrincham , Manchester che बाळू लोखंडे आहे की नाही अजब pic.twitter.com/es5Jhe1sP6
— Sunandan Lele (@sunandanlele) September 23, 2021
बाळू लोखंडे यांनी 15 वर्षांपूर्वी स्वतःचा मंडप डेकोरेटर्सचा व्यवसाय सुरू केला. लोखंडे यांच्याकडे अनेक कार्यक्रमांमध्ये टेबल व खुर्च्यांची मागणी व्हायची. त्यामुळे त्यांनी काही लोखंडी खुर्च्या हुबळी, कर्नाटक येथून घेतल्या होत्या. एका खुर्चीचे वजन 13 किलो होते. वजनाने जड असल्याने या खुर्च्या हाताळण्यास त्रास वाटू लागला. त्यामुळे लोखंडे यांनी खुर्च्या भंगारात कवठेमहांकाळ येथे 10 रुपये दराने विपून टाकल्या, तर काही खुर्च्या आठवण म्हणून आजही जपून ठेवल्या आहेत.
भंगारात विकलेल्या या खुर्च्या पुढे मुंबईपर्यंत पोहोचल्या. त्या एका परदेशी व्यावसायिकाने दुर्मिळ खुर्च्या म्हणून विकत घेतल्या. पूर्वीच्या काळातील मजबूत लोखंड असल्यामुळे यापैकी काही खुर्च्या मँचेस्टरच्या रेस्टॉरंट मालकाने विकत घेतल्या.


































































