सांगली जिल्ह्यात 60 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप, 66.42 लाख क्विंटल साखर उत्पादन

सांगली जिल्ह्यात साखर कारखान्यांचा हंगाम जोमात सुरू आहे. तीन महिन्यांत सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांकडून तब्बल 60 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करून 66 लाख 42 हजार क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. जिह्याचा सरासरी उतारा 11.1 टक्का राहिला आहे. वसंतदादा कारखाना चालवायला घेतलेल्या ‘दत्त इंडिया’ने गाळपात सर्वाधिक 7 लाख 97 हजार मेट्रिक टन, तर राजारामबापूचे कारंदवाडी युनिट 12.56 टक्के साखर उतारा घेत आघाडीवर आहे. अद्यापि 40 टक्के ऊस गाळपाच्या प्रतीक्षेत आहे.

शासनाने एक ऑक्टोबरपासून साखर कारखाने सुरू करण्यास परवानगी दिली होती; परंतु अवकाळी पाऊस आणि दिवाळीच्या सणामुळे हंगाम महिनाभर लांबला. हंगामापूर्वी उसाच्या दरावरून शेतकरी संघटनांनी आंदोलन सुरू केले. कोल्हापुरात शेतकरी संघटना आणि कारखानदारांची बैठक घेऊन ऊसदराबाबतचा तोडगाही काढला. कोल्हापूरचा पॅटर्न सांगली जिह्यासाठी लागू केला. त्यानुसार गाळप सुरू असलेल्या कारखान्यांकडून एकरकमी एफआरपी देण्यात आली आहे.

मागील सव्वातीन महिन्यांत सांगली जिह्यातील 13 साखर कारखान्यांनी 59 लाख 84 हजार मेट्रिक टन उसाचे गाळप करीत 66 लाख 42 हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले. सरासरी 11.01 टक्के साखर उतारा मिळाला आहे.

मार्चपर्यंत गाळप हंगाम सुरू राहणार

z अवकाळी पावसामुळे हंगामावर परिणाम झाला आहे. गतवर्षी सलग पाच महिने सुरू असलेल्या पावसामुळे उसाचे उत्पादन घटले असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिह्यात अद्यापि 40 टक्के ऊस शिल्लक असल्याचे दिसून येते. मजुरांची कमतरता भासत असली, तरी मशीननेही ऊसतोड होत आहे, त्यामुळे मार्चपर्यंत गाळप सुरू राहण्याची चिन्हे आहेत.

कारखाना गाळप साखर उतारा

(मे. टन) (लाख क्विंटल) (टक्के)

दत्त इंडिया 7.97 8.79 11.04

राजारामबापू 6.12 6.65 10.87

वाटेगाव युनिट 3.68 4.53 12.33

कारंदवाडी युनिट 2.77 3.47 12.56

जत युनिट 2.51 2.68 10.68

विश्वास 4.56 5.50 12.05

हुतात्मा 3.47 3.60 10.36

सोनहिरा 5.94 7.13 12.00

क्रांती कुंडल 6.16 6.40 10.04

मोहनराव 3.28 3.66 11.16

दालमिया 3.82 4.63 12.01

उदगिरी 4.12 4.53 11.00

सद्गुरू 5.53 4.79 8.91

एकूण 59.84 66.42 11.01