
राज्यात गुटखाविक्रीकर कडक बंदी असतानाही सांगली शहरासह जिह्यात दिवसाढवळ्या खुलेआम विक्री होते. याकडे पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन विभागाचे जाणीकपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे उघड झाले आहे. शहराच्या किकिध भागांतील पानटपऱ्यांवर गुटखा आणि तत्सम प्रतिबंधित पदार्थ सहज मिळतात. पोलिसांकडून कारवाई होऊनही चोरटय़ा वाहतुकीतून तस्करी जोमात सुरू असल्याचे आजही उघड आहे. यामागे असलेल्या तस्कर साखळीच्या मुसक्या अद्यापि आवळलेल्या नाहीत. गेल्या सहा महिन्यांत पोलिसांनी 74 लाख 94 हजार 864 रुपयांचा गुटखा आणि सुगंधी तंबाखू जप्त करत 16 जणांना अटक केली आहे.
बंदी असलेला गुटखा, सुगंधी पानमसाला तंबाखू किराणा दुकानांतही उघडपणे विकला जातो. गुटख्यावर कारवाईची जबाबदारी अन्न प्रशासन विभागासह पोलिसांची आहे. शहरासह ग्रामीण भागातून गुटखाविक्री, तस्करी, उत्पादन व साठवणूक सर्रास सुरू आहे. काही प्रमाणात होणारी कारवाई ही दिखावा असल्याचा आरोप काही नागरिक करत आहेत. मध्यंतरी पोलिसांनी आणि अन्न-औषध प्रशासनाच्या वतीने कारवाई करण्यात आली. पण, ही कारवाई काही दिवसांपूरतीच होती का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. गुटख्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सुगंधी पानमसाला व सुगंधी तंबाखूची विक्री होते. दररोज, कर्नाटक सीमाभागातून कोटय़वधी रुपयांचा गुटखा सांगलीत येतो. मोठय़ा ट्रकमधून गुटखा शहरात आणला जातो आणि त्यानंतर छोटय़ा वाहनांतून विवध भागांत त्याचे वितरण होते. या साखळीत तीन ते चार प्रमुख गुटखा व्यापाऱ्यांचा सहभाग असून, त्यांच्या हालचालींची संपूर्ण माहिती पोलिसांकडे असूनही त्यांच्याविरोधात ठोस कारवाई केली जात नसल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या विरोधात ठोस कारवाई होण्याची गरज आहे.
कोटय़वधींची उलाढाल
n सांगली-मिरज शहरांत गुटखा विक्री बंदीची अंमलबजाकणी करताना संबंधित यंत्रणांमध्ये गांभीर्याचा अभाक जाणून येतो. काळ्या बाजारातून दररोज कोटय़कधी रुपयांची उलाढाल होते. स्थानिक गुटखातस्कर, वितरक, दुकानदार आणि त्याकडे दुर्लक्ष केले जाते. यातून कोटय़कधी रुपयांची उलाढाल होते. उमदी, महात्मा गांधी पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकांनी मध्यंतरी कारवाई करून लाखोंचा गुटखा पकडला. मिरजेत ‘पुष्पा स्टाईल’ने भाजीपाल्याच्या आत गुटखा, सुगंधी तंबाखू लपवून त्याची तस्करी केल्याचं उघड झालं होतं. या कारवाईत केवळ पंटर सापडतात. मुख्य तस्कर मात्र मोकाट सुटल्याचे चित्र आहे.
पोलीस अधीक्षक कठोर भूमिका घेणार का?
n शहरातील बेकायदा धंद्यांना तीव्र विरोध करणारे पोलीस अधीक्षक गुटख्याबाबत भूमिका घेणार का, असा प्रश्न सांगलीकरांना पडला आहे.


























































