संगमेश्वरात एटीएम फोडणाऱ्या चोरट्याला पाच तासांत अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील संगमेश्वर इथले एटीएम चोरट्याने फोडून पलायन केले. मात्र, एटीएमसाठी नेमलेल्या वॉचमनने प्रसंगवधान दाखवित त्याचा पाठलाग केला तसेच पोलिसांना याबाबत महिती दिली. सलग पाच तासाच्या शोधानंतर चोरटा संगमेश्वर पोलिसांच्या जाळयात सापडला आहे.

पोलिसांनी वॉचमनच्या सहाय्याने फिल्मी स्टाईने चोराला पकडले असून या चोरट्याकडून अनेक गुन्हयांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. हेमंत देसाई (रा. मुंबई) असे पकडण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे.

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वर जवळ श्री समर्थ कृपा बिल्डिंगच्या तळमजल्यावर कॅनरा बँकेचे एटीएम मशिन आहे. शुक्रवारी रात्री सव्वा अकराच्या सुमाराला संदिप नारायण महाडिक याने त्या चोरट्याला हटकले. तो पळू लागल्यावर संशय आला म्हणून त्याचा पाठलाग सुरु केला. तसेच पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक उदय झावरे हे पोलीस शिंदे, देशमवांड, खोंदल, आव्हाड, रामपुरे तसेच होमगार्ड झेपले यांना घेऊन घटनास्थळी आले.

तोपर्यंत चोरटा संगमेश्वर बसस्थानकाच्या जवळच्या घरांमध्ये शिरला पोलिसांनी चोरट्याचा शोध सुरु केला. सलग पाच तास फिल्मी स्टाईलने रात्रीच्या दरम्याने केलेल्या पाठलागानंतर चोरट्याला पकडण्यात यश आले. याबाबत संगमेश्वर पोलीस ठाण्यात मधुकर देवरुखकर यांनी फिर्याद दिली आहे.