सेम टू सेम! ‘केजीएफ 2’ मधील संजूबाबाचा लूक पाहून चाहते म्हणाले, कॉपीपेस्ट!

1878

केजीएफच्या तुफान यशानंतर या चित्रपटाचा सिक्वेल ‘केजीएफ 2’ लवकरच रिलीज होणार आहे. या चित्रपटात अभिनेता संजय दत्त हा अधीरा नावाच्या खलनायकाच्या भूमिकेत झळकणार आहे. याद्वारे तो दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण करतोय.

संजूबाबाच्या वाढदिवशी  त्याचा या चित्रपटातील फर्स्ट लूक समोर आला होता. अनेकांनी त्याच्या या लूकचे कौतुकदेखील केले होते. मात्र त्याचा हा लूक चोरीचा असून त्याची तुलना वायकिंग्स या सिरीजच्या पोस्टरसोबत केली जात आहे. डाएट सब्या या इंस्टाग्राम पेजने आपल्या अकाऊंटकरून हा प्रकार उघडकीस आणला आहे. या सिरीजमधील रग्नार लोथब्रुक या कॅरेक्टरच्या लूकशी साधर्म्य साधणारा संजय दत्तचा लूक आहे. त्यानंतर सोशल मीडियावर दोन्ही पोस्टर व्हायरल होत असून अनेकांनी कॉपी पेस्ट अशी प्रतिक्रिया दिली आहे. ‘वायकिंग्स’ ही लोकप्रिय ऐतिहासिक सिरीज असून या सिरीजचे आतापर्यंत 6 भाग प्रदर्शित झाले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या