‘ईडी’ने आज सत्र न्यायालयात आपले म्हणणे सादर केले. त्यामुळे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर सोमवार 19 सप्टेंबर रोजी सुनावणी घेण्याचे आदेश सत्र न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांनी दिले.
संजय राऊत यांच्या वतीने अॅड. विक्रांत साबणे यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला असून या अर्जाची दखल घेत ‘ईडी’ने 16 सप्टेंबरपर्यंत आपले म्हणणे मांडावे, असे आदेश न्यायाधीश देशपांडे यांनी दिले होते. त्यानुसार ‘ईडी’च्या वतीने अॅड. कविता पाटील यांनी आज न्यायालयात लेखी उत्तर सादर केले. ‘ईडी’चा अर्ज दाखल झाल्यानंतर न्या. देशपांडे यांनी यावर पुढील सुनावणी सोमवारी होईल असे आदेश दिले.



























































