Operation Sindoor आता थांबायचे नाही, चून चून के मारो – संजय राऊत

हिंदुस्थानी हवाई दलाने बुधवारी रात्री ‘ऑपरेशन सिंदूर’ करून पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त कश्मीरमधील 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. या हल्ल्यानंतर संपूर्ण देश हिंदुस्थानच्या संरक्षण दलाचे कौतुक करत आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी देखील याबाबत ट्विट करत हिंदुस्थानच्या सेनेचे अभिनंदन केले आहे. ”आता थांबायचं नाही, एक एका दहशतवाद्यांना शोधून शोधून मारायचं”, असे त्यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.

”भारतीय सेनेचे अभिनंदन! आता थांबायचे नाही.चून चून के मारो! सरकारने सर्व पक्षीय बैठक बोलावली आहे. शिवसेना या बैठकीत उपस्थित राहील! जय हिंद!”, असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे.

केंद्र सरकारने बोलावली सर्व पक्षीय बैठक

ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्यासाठी केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. 8 मे रोजी सकाळी 11 वाजता संसदेत ही बैठक होणार आहे. या बैठकीत ऑपरेशन सिंदूरबद्दल विरोधी पक्षांना माहिती दिली जाईल आणि पुढची रणनीती काय असेल याबाबत सांगितले जाईल. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी एक्सवर पोस्ट करून याबाबत माहिती दिली आहे. सर्वपक्षीय बैठक संसदेच्या पुस्तकालय भवनातील समिती कक्षा जी074 मध्ये होईल असे रिजिजू यांनी म्हटले आहे.