विठ्ठलभक्तीत रममाण झालेल्या संत भागूबाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संत कवयित्रींच्या काव्यातून त्यांच्या अनुभवविश्वाचा विचार आपल्याला थक्क करतो. त्यांच्या काव्यात गूढ, उदात्त व आनंददायी असा आशाय असतो. यां संत कवयित्रींपैकी एक म्हणजे संत भागूबाई. त्यांचे केवळ चार-पाच अभंग उपलब्ध आहेत. ‘प्राचीन गीत भांडार’ मध्ये त्यांचे दोन अभंग उपलब्ध असल्याचा उल्लेख येतो. भागूबाई या संत चोखामेळा परिवारातील होत्या. त्यांच्या वाटय़ाला अलेले उपेक्षित जीवन त्यांनी रचनांमधून मांडले आहे. भागूबाई विठ्ठलाला साधा प्रश्न विचारतात की, ‘तू इतर संतांना भेटतोस, बोलतोस तर माझ्याशी का नाही बोलत?’ हाच भाव त्यांच्या अभंगांतदेखील दिसतो. ‘आलो तुझ्या दर्शनासी। भेट द्यावी हो आम्हासी।। सर्व संत हो राऊळी। मी रे एकटी तळमळी।।’ संत भागूबाई विठ्ठलमय झाल्या होत्या. एवढा धीट प्रश्न देवाला विचारायचा अधिकार भागूबाईंना मिळाला असावा. भागूबाईंना ज्ञानेश्वरांच्या अभंगाची आठवण येत असे. त्सात त्या भिंत चालवण्याचा उल्लेख करतात. ‘भिंती चालवली। ऐसी कृपाळू माऊली।।’ भागूबाई सतत एका भास सृष्टीत वावरायच्या. त्यांना केवळ भक्तीचा ध्यास होता. या भक्तीनेच सामान्य स्त्रियांच्यात खूप मोठे परिवर्तन घडवून आणले.