
कमरेला कृपाण असल्याच्या कारणास्तव पंजाबमधून आलेल्या सरपंचाला लाल किल्ल्यावर प्रवेश नाकारल्याची घटना उघडकीस आली आहे. या सरपंचाने गावात शौचालये उभारण्यासह स्वच्छता आणि अनेक समाजोपयोगी कामे केली. त्याबद्दल त्यांचा जल शक्ती विभागाकडून गौरवही करण्यात आला होता. आता त्यांना स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ला येथे आमंत्रित करण्यात आले होते.
गुरध्यान सिंह असे या सरपंचाचे नाव असून त्यांना आल्या पावली दिल्लीतून राष्ट्रीय सन्मान न स्वीकारताच पुन्हा गावी परतावे लागले. ते पंजाबच्या कलसाना गावचे सरपंच आहेत. त्यांनी गावात जल प्रक्रिया प्रकल्प तसेच शौचालये उभारली. त्याचबरोबर स्वच्छतेवर भर दिला. गुरध्यान सिंह लाल किल्ल्यावर पोहोचले. त्यांना पाच क्रमांकाच्या गेटवरून व्हीआयपी एण्ट्री देण्यात येणार होती, परंतु सुरक्षा अधिकाऱयांनी त्यांना कृपाणसह प्रवेश नाकारला. सुरक्षा रक्षकांनी त्यांना कृपाण बाहेर ठेवून आत जायला सांगितले, परंतु त्याला त्यांनी नकार दिला.