सौरभ डिंगरेचा कान्स महोत्सवात डंका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
पंढरपूर येथील चित्रकार सौरभ डिंगरे याने रेखाटलेले चित्र थेट फ्रान्समधील कान्स चित्रपट महोत्सवात झळकले आहे. त्याच्या या कलेचे पंढरीत कौतुक होत आहे. कान्समध्ये सध्या चित्रपट महोत्सव सुरु आहे. कान्समध्ये मदालसा या चित्र प्रकारातील तीन चिमुकल्या मुलींचे चित्र सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. ते सौरभ डिंगरे याने रेखाटले आहे. त्याच्या या चित्राची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे.
सौरभच्या या चित्रांमुळे पंढरीच्या शिरपेचात आणखी एक तुरा लागला आहे. सौरभ डिंगरे हा आपली चित्रे मदालसा बाय सौरभ या नावाने प्रसिद्ध करतो. अनेक हिंदी, मराठी कलाकार, उद्योगपती यांच्याकडे त्याची चित्रे आहेत. मुंबई, पुणे, बंगळूर, गोवा, कोलकाता अशा मोठ्या शहरातही त्याच्या चित्रांची प्रदर्शने भरवली जातात.
कान्स चित्रपट महोत्सवासाठी त्याने रेखाटलेले मराठमोळ्या लहान मुलींचे चित्र आणि त्यातून मराठी संस्कृतीची झळकलेली अस्मिता ही सौरभच्या कलेबाबत फ्रान्समध्ये डंका वाजवून गेली. यानिमित्ताने सौरभच्या कल्पकतेचे आणि सुर्जनशीलतेचे करावे तेवढे कौतुक थोडेच असल्याच्या प्रतिक्रिया तमाम पंढरपूरकर कलाप्रेमी नागरिकांमधून उमटत आहेत.