आरे आंदोलनामुळे परीक्षेस मुकलेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा, युवासेनेची मागणी मान्य

486

आरे आंदोलनामुळे विविध परीक्षांना मुकलेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्यात येणार आहे. मेट्रो कारशेडसाठी आरेमधील झाडांच्या कत्तलीविरोधात शेकडो पर्यावरणप्रेमी तरुण विद्यार्थ्यांनी आंदोलनात भाग घेतला होता. या विद्यार्थ्यांना अटक करण्यात आल्याने त्यांना परीक्षेस मुकावे लागले होते

मुंबई विद्यापीठाच्या मंगळवारी पार पडलेल्या सिनेटच्या बैठकीत युवासेनेच्या वतीने सिनेट सदस्य प्रदीप सावंत, शीतल देवरुखकर यांनी हरकतीच्या मुद्दय़ाद्वारे परीक्षेस मुकलेल्या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी केली. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्याची मागणी मान्य केली तसेच ज्या विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ते मागे घेण्यासाठी राज्यपालांकडे विनंतीपत्र पाठविणार असल्याचेही कुलगुरूंनी स्पष्ट केले.

पूरग्रस्त विद्यार्थ्यांची फी माफ

पूरस्थिती आणि ओला दुष्काळ सोसणाऱया विद्यार्थ्यांची विद्यापीठ व महाविद्यालयीन फी माफ होणार आहे. हरकतीच्या मुद्दय़ावर प्रदीप सावंत यांनी पूरग्रस्त विद्यार्थ्यांची फी माफ करण्याची मागणी कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांच्याकडे केली होती.

 

आपली प्रतिक्रिया द्या