
सामना ऑनलाईन । पणजी
यंदा 2018-19 या हंगामात प्रशिक्षक क्लिफर्ड मिरांडा यांच्या मागर्दर्शनाखाली गोवा फुटबॉल असोसिएशन (जीएफए) प्रो लीग स्पर्धा जिंकली आहे. या संघातील चौघांना एफसी गोवाच्या मुख्य संघात स्थान मिळाले. त्यापैकी सेवियर गामा हा एक 22 वर्षीय युवक लेफ्ट बॅक खेळाडू आहे. त्याला असोसिएशनने 2021 पर्यंत करारबद्ध केले आहे. मोहम्मद नवाझ, लिस्टोन कोलाको आणि प्रिन्स्टन रेबेलो यांच्या बरोबरीने गामा याने राष्ट्रीय स्तरावर सीनियर फुटबॉलपर्यंत पाऊल टाकले आणि इंडियन सुपर लीग आणि हीरो सुपर कपमध्ये सहा सामने खेळले आहेत.




























































