सुप्रीम कोर्टाचे कामकाज बुधवारी महिला न्यायाधीश चालविणार

33
supreme-court-1

सामना ऑनलाईन , नवी दिल्ली

5 सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात इतिहासाची पुनरावृत्ती होणार आहे. आर. भानुमती आणि इंदिरा बॅनर्जी यांचा समावेश असलेले द्विसदस्यीय पीठ या दोन महिला न्यायाधीश बुधवारी चालविणार आहेत.

अशा प्रकारची घटना यापूर्वी सुप्रीम कोर्टात घडल्याची नोंद 2013 मध्ये झालेली आहे. तेव्हा ग्यान सुधा मिश्रा, रंजना प्रकाश देसाई या दोन महिला न्यायाधीशांनी एकत्र बसून पीठ चालविले होते. त्यानंतर इतिहाची पुनरावृत्ती बुधवारी सुप्रीम कोर्टात जवळ जवळ पाच वर्षांनंतर प्रथमच होत आहे.

महिला न्यायाधीशांची संख्या प्रथमच तीन

इंदिरा बॅनर्जी यांचा सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीश म्हणून ऑगस्टमध्येच शपथविधी झालेला आहे. यामुळे सुप्रीम कोर्टात महिला न्यायाधीशांची संख्या इतिहासात प्रथमच आता तीनवर गेली आहे. या तीन महिला न्यायाधीशांमध्ये आर. भानुमती या सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश असून त्या ऑगस्ट 2014 मध्ये सुप्रीम कोर्टात न्यायाधीश झालेल्या आहेत.

आतापर्यंत आठ महिला न्यायाधीश

फातिमा बिवी या सुप्रीम कोर्टाच्या पहिल्या न्यायाधीश होत्या. त्यांच्यानंतर सुजाता मनोहर, रुमा पाल, ग्यान सुधा मिश्रा, रंजना प्रकाश देसाई, आर. भानुमती, इंदिरा मल्होत्रा आणि आता इंदिरा बॅनर्जी या आजवरच्या सुप्रीम कोर्टातील महिला न्यायाधीश आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या