‘स्कॅम 1992’ नंतर येणार ‘स्कॅम 2003’

स्कॅम 1992- द हर्षद मेहता स्टोरी’ या वेबसीरिजच्या तुफान यशानंतर आता सोनी लिव्हच्या वतीने ‘स्कॅम’ फ्रँचायझीच्या दुसऱया सिझनची घोषणा केली आहे. ‘स्कॅम 2003 – द क्युरियस केस ऑफ अब्दुल करीम तेलगी’ असे या वेबसीरिजचे नाव असणार आहे.

स्टॅम्प पेपर घोटाळ्याचा प्रमुख सूत्रधार अब्दुल करीम तेलगीची कथा यात पाहायला मिळणार आहे. हंसल मेहता हेच या सीरिजचे दिग्दर्शन करणार आहेत. पत्रकार संजय सिंग यांच्या ‘रिपोर्टर की डायरी’ या पुस्तकावर ही सीरिज आधारित आहे. गतवर्षी आलेल्या ‘स्कॅम 1992’ मध्ये अभिनेता प्रतीक गांधी यांनी हर्षद मेहताची भूमिका साकारली होती. अब्दुल करीम तेलगीची भूमिका कोण साकारणार याकडे साऱयांचे लक्ष लागले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या