>> स्पायडरमॅन
निसर्ग अनेक चमत्कारिक घटना घडवत असतो. इंटरनेटच्या युगामुळे अशा घटना आता आपल्यापर्यंत लगेच पोहोचतात. काही दिवसांपूर्वी बदलत्या हवामानाच्या परिणामामुळे व्हेनेझुएला देशातील शेवटची हिमनदीदेखील कशी लुप्त झाली हे आपण या सदरात वाचले असेल. आता असाच बदलत्या हवामानाचा फटका अलास्का देशालादेखील बसायला लागला आहे. इथल्या आरस्पानी, नितळ नद्यांच्या पाण्याचा रंग बदलत आहे. जगभरातील संशोधकांनी या घटनेची गांभीर्याने नोंद घेतली असून त्यावर अभ्यास चालू केला आहे. अलास्कातील नद्याच नव्हे, तर काही नाले आणि ओढे यांचे पाणीदेखील आता नारिंगी होऊ लागले आहे. पृथ्वीचा पर्माफ्रॉस्ट (गोठलेली जमीन) वेगाने वितळत आहे हे यामागचे प्रमुख कारण असल्याचे सध्या तरी अभ्यासातून समोर आले आहे. पर्माफ्रॉस्टच्या या वितळण्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागातून अनेक प्रकारचे विषारी धातू बाहेर पडत आहेत. त्यांच्या संपका&त आल्याने या पाण्याचा रंग बदलू लागला आहे. नॅशनल पार्क सर्व्हिस, डेव्हिस येथील पॅलिपहर्निया विद्यापीठ आणि यू.एस. या शोधामुळे भूवैज्ञानिक सर्वेक्षणाच्या संशोधकांनी या अभ्यासात भाग घेतला. समोर आलेल्या निष्कर्षामुळे त्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. संशोधकांनी अलास्काच्या ब्रूक्स रेंजमधील जलमार्गातील 75 साईट्सवर चाचण्या केल्या. पाण्याचा रंग बदलण्याच्या प्रक्रियेला खरे तर गेल्या पाच ते दहा वर्षांपासून सुरुवात झाली असल्याचा काही संशोधकांचा दावा आहे. पर्माफ्रॉस्ट वितळू लागल्याने शिसे, जस्त, निकेल, तांबे, लोह यांच्या संपका&त हे पाणी येऊ लागल्याने हा परिणाम दिसत आहे. रंग बदलत असलेल्या अशा नद्या आणि नाल्यांपैकी काहींचा आजूबाजूच्या परिसंस्थेवरदेखील घातक परिणाम होत असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आर्टिक्टचा प्रदेश इतर जगाच्या तुलनेत चारपट वेगाने जास्त गरम होत आहे या दाव्याला अशा घटना पुष्टी देत आहेत.