विना सीटबेल्टविरोधात पूर्व उपनगरात सर्वाधिक कारवाया

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विनासीटबेल्ट चारचाकीतून प्रवास करणाऱ्यांविरोधात वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई सुरू केली असून गेल्या 22 दिवसांत 43 हजार 689 जणांवर चलानची कारवाई करण्यात आली आहे.  चलान कारवाईचा सर्वाधिक आकडा पूर्व उपनगरात आहे.

चारचाकीतून प्रवास करताना चालक आणि सहप्रवाशांना सीटबेल्ट लावणे मुंबईत सक्तीचे करण्यात आले आहे. चुकून अपघात झाल्यास त्यात गाडीतील कोणाचा मृत्यू होऊ नये अथवा कायमचे जायबंदी होऊ नये याकरिता मुंबई पोलिसांनी प्रवासात गाडीतील सर्वांनाच सीटबेल्ट लावणे सक्तीचे केले आहे. एक महिन्याच्या पूर्वकल्पनेनंतर 1 नोव्हेंबरपासून पोलिसांनी विनासीटबेल्ट प्रवास करणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाईला सुरुवात केली. 1 ते 22 नोव्हेंबर या कालावधीत संपूर्ण शहरात 43 हजार 689 जणांना चलान करण्यात आले. त्यापैकी 20 हजार 970 चालक, तर 20 हजार 719 अन्य प्रवाशांचा समावेश आहे.