
सामना प्रतिनिधी । मुंबई
हिमालय पूल दुर्घटनेप्रकरणी आज आझाद मैदान पोलिसांनी अतिरिक्त पुरवणी आरोपपत्र न्यायालयात सादर केले. 306 पानांच्या आरोपपत्रात 90 जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलला जोडणारा हिमालय पूल 14 मार्चला कोसळला होता. या दुर्घटनेत सातजणांना प्राण गमवावा लागला होता तर 30 जण जखमी झाले होते. या घटनेचा तपास आझाद मैदान पोलीस करत आहेत. पोलिसांनी तपास करून 9 मे रोजी 650 पानांचे आरोपपत्र न्यायालयात सादर केले होते. त्यानंतर आज आझाद मैदान पोलिसांनी 306 पानांचे पुरवणी आरोपपत्र न्यायालयात सादर केले. त्या आरोपपत्रात व्हीजेटीआय आणि न्याय सहायक प्रयोगशाळेचे अहवाल जोडले आहेत. आरोपपत्रानुसार पोलिसांनी 90 साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत. त्यात पालिकेचे कर्मचारी आणि प्रत्यक्षदर्शींचा समावेश आहे.


























































