
पंतप्रधान कार्यालयाचा पत्ता बदलणार
पंतप्रधान कार्यालयाचा पत्ता बदलणार आहे. सध्या पीएमओ कार्यालय साऊथ ब्लॉकमध्ये आहे. हे कार्यालय पुढील महिन्यात एक्झिक्युटिव्ह एन्क्लेव्ह येथे शिफ्ट होणार आहे. नव्या एन्क्लेव्हमध्ये अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत.
पाच कंपन्यांचे आयपीओ लवकरच बाजारात
मंगळारपासून पटेल रिटेल, विक्रम सोलर, जेम ऍरोमॅटिक्स, श्रीजी शिपिंग ग्लोबल आणि मंगल इलेक्ट्रिकल या पाच कंपन्या त्यांचे आयपीओ बाजारात आणणार आहेत. या कंपन्या एकत्रितपणे तब्बल 3,584 कोटी रुपयांहून अधिक निधी उभारणार आहेत
नवीन पटनायक रुग्णालयात दाखल
ओदिशाचे माजी मुख्यमंत्री आणि बीजेडीचे प्रमुख नवीन पटनायक आज सायंकाळी सवापाचच्या सुमारास डीहायड्रेशनच्या तक्रारीमुळे भुवनेश्वरच्या खासगी रुग्णालयात दाखल झाले. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
बंगालमध्ये दुर्गा मंडपांसाठी सरकारकडून 500 कोटी
पश्चिम बंगालमध्ये यंदा 45 हजारांहून अधिक दुर्गा मंडप उभारण्यात आले असून यात एकटय़ा कोलकात्यात 3 हजार 100 मंडप आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रत्येक मंडपाला 1.10 लाख रुपयांप्रमाणे एकूण 500 कोटींचे अनुदान दिले आहे.
पाकिस्तानात 48 तासांत पुराचे 327 बळी
ढगफुटीसदृश पाऊस आणि भूस्खलनामुळे गेल्या 48 तासांत पाकिस्तानातील बळींचा आकडा तब्बल 327 वर गेला आहे, तर 26 जूनपासून सुरू झालेल्या अतिवृष्टीत आतापर्यंत तब्बल 650 जणांचा मृत्यू झाला आहे. 21 ऑगस्टपर्यंत अतिवृष्टी आणि महापुराचा इशारा दिला आहे.