
राज्य सरकारने सुपर मार्पेटमध्ये वाईन विक्रीला दिलेली परवानगी आणि त्याला होत असलेला विरोध हा काही फार चिंतेचा विषय नाही. वाइन आणि लिकरमधील फरक ओळखण्याची भूमिका घेतली पाहिजे, पण तशी भूमिका घेण्यात आली नाही. जर या निर्णयाला विरोध होत असेल आणि राज्य सरकारने सुपर मार्पेटमध्ये वाइन विक्रीचा निर्णय बदलला तरी त्याचे मला वाईट वाटण्याचे कारण नाही, असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. बारामतीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पवार बोलत होते.






























































