माजी वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
police

सामना प्रतिनिधी, मुंबई

कुंटणखान्यातून सुटका केलेल्या तीन अल्पवयीन मुलींना पुन्हा कुंटणखान्याच्या मालकिणीला विकल्याच्या आरोपाखाली माजी वरिष्ठ निरीक्षक कलंदर शेख व डबा पांडेला नागपाडा पोलिसांनी अटक केली.

2004 साली शेख हे नागपाडा पोलीस ठाण्यात वरिष्ठ निरीक्षक म्हणून कार्यरत होते. तेव्हा एका एनजीआने नागपाडा येथील कुंटणखान्यात छापा टाकला होता. छापा टाकून मुलीची सुटका केली. त्या तीन अल्पवयीन मुलांची रवानगी सुधारगृहात न करता त्याची परस्पर विक्री केल्याचा शेख यांच्यावर आरोप आहे. याबाबत एकाने पाठपुरावा केला होता. याची चौकशी व्हावी त्यासाठी शिवडी कोर्टात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने नागपाडा पोलिसांना चौकशीचे आदेश दिले. पोलिसांनी गुन्हा नोंद करून शेख आणि पांडेला अटक केली. दोघांनाही न्यायालयात हजर करण्यात आले होते.