ज्ञानदेव साठे यांचे निधन

अखिल भारतीय मातंग संघाचे जेष्ठ नेते ज्ञानदेव साठे यांचे हृदयविकाराने निधन झाले. ते 65 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, तीन मुली, जावई असा परिवार आहे. ज्ञानदेव साठे हे अण्णा भाऊ साठे नगर, मानखुर्द येथील मातंग समाजाचे अध्यक्ष होते. ते क्रांतिसम्राट बाबासाहेब गोपले यांच्या तालमीत तयार झालेले कार्यकर्ते होते. त्यांच्या अंत्यसंस्काराला मातंग समाजाच्या राष्ट्रीय नेत्या कुसुम गोपले, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बी. जी. गायकवाड यांच्यासह शेकडो मातंग समाजबांधव उपस्थित होते.