डॉ. मनोहर जोशी यांची मंगळवारी श्रद्धांजली सभा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री डॉ. मनोहर जोशी यांचे शुक्रवारी पहाटे हृदयविकारामुळे निधन झाले.

डॉ. मनोहर जोशी सरांना आदरांजली वाहण्यासाठी जोशी कुटुंबीयांच्या वतीने प्रार्थना सभा आयोजित केली आहे. मंगळवार, 27 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4 ते 7 या वेळेत वॉव्हज बँक्वेट, सिद्धिविनायक मंदिरासमोर, प्रभादेवी येथे ही प्रार्थना सभा होणार असल्याचे जोशी कुटुंबीयांकडून कळविण्यात आले आहे.