ज्येष्ठ जलतरणपटू मन्या ठाकूर यांचे निधन

ज्येष्ठ जलतरणपटू मन्या ठाकूर यांचे सोमवारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 87 वर्षांचे होते. मन्या ठाकूर यांच्या निधनानंतर महाराष्ट्रातील क्रीडा क्षेत्रामधून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

मन्या ठाकूर यांचा जलतरण आणि वॉटरपोलो या दोन क्रीडा प्रकारांमध्ये हातखंडा होता. सागरी जलतरणात त्यांनी स्वतŠचे विशेष स्थान निर्माण केले होते. दादर येथील महात्मा गांधी जलतरण तलावाचे ते सदस्य होते. मन्या ठाकूर हे पश्चिम रेल्वेमधून सेवानिवृत्त झाले होते. शिवाय ते स्वतŠ शिवसैनिक होते. तसेच त्यांचे वडील शिवसेना भवनात आजन्म कार्यरत होते.

बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून सन्मानित

मन्या ठाकूर यांनी गेट वे ऑफ इंडिया ते धरमतर आणि धरमतर ते गेट वे ऑफ इंडिया असे एकूण 90 सागरी मैलांचे अंतर 26 तासांमध्ये पूर्ण केले होते. या उपक्रमात त्यांना विश्वनाथ टाकळे व विनोद गुरुजी यांची साथ लाभली होती. याप्रसंगी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मन्या ठाकूर यांच्या कामगिरीचे काैतुक करून त्यांना सन्मानित केले होते.

आपली प्रतिक्रिया द्या