
आज शेअर बाजार 1300 अंकाने कोसळला आहे. तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या निफ्टीचीही घसरण झाली आहे. जगात अनेक ठिकाणी कोरोनाने डोकं वर काढल्याने बाजार कोसळला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी मध्ये औषध कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण झालेली नाही. तर ऑटोमोबाईल, स्टील आणि उर्जा क्षेत्राशी संबंधित कंपन्यांचे शेअर्स घसरले आहेत.
शेअर बाजार खुलताच सेन्सेक्स 720 अंकांनी कोसळला आणि सेन्सेक्स 58 हजार 75.93 वर उघडला. तर गुरूवारी सेन्सेक्स 58 हजार 795.09 वर जाऊन थांबला होता. सकाळपासून बाजार पडल्याने सेन्सेक्स 1300 अंकांनी कोसळला आहे.
Sensex plunges more than 1300 points, Nifty below 17,200
— ANI (@ANI) November 26, 2021
सकाळी सेन्सेक्समधील 30 कंपन्यांपैकी केवळ डॉक्टर रेड्डीजचे शेअर ग्रीज झोनमध्ये दिसते होते. तर मारूती सुझुकीचे शेअर अडीच टक्क्यांनी कोसळेल आहेत. नंतर हे शेसर 3.7 टक्क्यांनी तर टायटनचे शेअर 3.92 टक्क्यांनी कोसळले आहेत.
निफ्टीही 404 अंकाने कोसळला
गुरूवारी निफ्टी 17 हजार 536 अंकावर बंद झाला होता. पण आज निफ्टी 404 अंकांनी कोसळला आहे. आता निफ्टी 17 हजार 131 वर आहे.
































































