
मनी लाँडरिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) अटक करण्यात करण्यात आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत सत्र न्यायालयाने 22 एप्रिलपर्यंत वाढ केली आहे.
न्यायालयीन कोठडीत असलेल्या नवाब मलिक यांची कोठडीतील मुदत संपल्याने आज त्यांना सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. विशेष सत्र न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यासमोर सुनावणी झाली. अॅड. कुशल मोरे यांनी युक्तिवाद करताना सांगितले की, बेकायदेशीर अटकेविरोधात मलिकांनी सर्वेच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून त्यावर 22 एप्रिलला सुनावणी आहे. न्यायाधीशांनी हा युक्तिवाद ऐकून घेत मलिकांच्या कोठडीत 22 एप्रिलपर्यंत वाढ करत सुनावणी तहकूब केली.
























































