
रत्नागिरी शहरात ओसवाल नगर येथील सेक्स रॅकेट प्रकरणातील दोन आरोपींना आज न्यायालयात हजर केले असता त्यांना 1 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सेक्स रॅकेटमध्ये संपर्कात आलेल्या व्यक्तींचा पोलीस शोध घेत आहेत.
रत्नागिरी पोलिसांनी ओसवालनगर येथील बंगल्यावर धाड टाकून सेक्स रॅकेटचा पर्दापाश केला होता.याप्रकरणात पद्मीनबाई बादलवाड आणि शिवाजी पाटील अशा दोन आरोपींना अटक करण्यात आली होती.यावेळी एका पिडित तरूणीची सुटका करण्यात आली.
प्रकरणाची सखोल चौकशी करणार-पोलीस अधीक्षक जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.मोहितकुमार गर्ग यांनी पत्रकारांना सांगितले की,हे प्रकरण अधिक गांभीर्याने घेत असून त्याचा सखोल तपास करणार आहोत.






























































