
देशातील ब्लू कॉलर जॉबच्या संधींमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्याच्या हेतूने शॅडोफॅक्स टेक्नॉलॉजीज या हिंदुस्थानाच्या आघाडीच्या क्राऊड सोर्स केलेल्या लॉजिस्टिक प्लॅटफॉर्मने आज हिंदुस्थानाच्या पहिल्या डिलिव्हरी सुपर अॅपच्या अनावरणाची घोषणा केली. या अॅपचे प्राथमिक उद्दिष्ट हे डिलिव्हरी भागीदारांच्या आयुष्यात मोठ्या प्रमाणावर सुधारणा करण्याचे आणि त्यासाठी त्यांना एकाच प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून विविध प्रकारच्या संधी देण्याचे आहे.
मागील काही महिन्यांत डिलिव्हरी आणि ब्लू कॉलर जॉबच्या संधींमध्ये मोठी वाढ झाली आहे. ही वाढ पुढेही सुरू राहणार असून रायडर्ससाठी मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होतील. ही कल्पना सध्याच्या विविध अॅप्समध्ये साइन इन करण्याच्या किंवा ठेवण्याच्या त्रासातून आली आहे. हे खूप वेळखाऊ आणि कमी फायदेशीर आहे, कारण रायडर्सच्या संधी हातातून जाऊ शकतात.
या सुपर अॅपची रचना विशेषतः या समस्येवर उपाय काढण्यासाठी आणि डिलिव्हरी भागीदारांसाठी सोय आणण्यासाठी केली गेली आहे. यासोबत रायडर्सना एकाच अॅपच्या माध्यमातून सर्व कंपन्या वैयक्तिकरित्या गुंतवणूक करण्याची गरज न पडता पाहता येतील. ही प्रक्रिया वेळेची बचत करणारी, सोयीची व सुलभ आहे आणि ती माहिती पूर्ण करण्यासाठी सहजसाध्यता देते. त्यामुळे त्यांच्या कमावण्याच्या संधी वाढतात.
रायडर्सना तात्काळ पेआऊट्स, रोजचे वेतन, आकर्षक चालू भांडवल कर्जे, विमा आणि विविध प्रकारचे इतर फायदे मिळू शकतात, जे रायडर्सच्या गरजांनुरूप असतील. हे सुपरअॅप विविध भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे. सुपरअॅपचे अनावरण आणि त्याच्या उद्दिष्टाबाबत बोलताना शॅडोफॅक्स टेक्नॉलॉजीजचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अभिषेक बन्सल म्हणाले की, “आम्हाला या अॅपच्या अनावरणामुळे खूप अभिमान वाटतो आहे, कारण तो हजारो रायडर्ससाठी आयुष्य बदलणारा आणि लाखो आयुष्यांवर प्रभाव टाकणारा आहे. तो हिंदुस्थानातील बदलत्या डिलिव्हरी क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आम्ही या व्यासपीठाकडे उत्तम लेव्हलर म्हणून बघतो कारण तो आमच्या संपूर्ण राइड बेसला विविध प्रकारच्या संधी उपलब्ध करून देतो.
रायडर्सना अधिक लवचिकता, सोय आणि चांगले उत्पन्न यांच्या सोयी मिळतात तर कंपन्यांना आपल्या रायडर बेस गरजांनुसूर वाढवता येतो. त्यामुळे त्यांना कोणत्याही वाढीव खर्चाशिवाय आपली व्याप्ती सहजपणे वाढवता येईल.” हा हिंदुस्थानातील पहिला डिलिव्हरी अॅप आहे जो एकाच व्यासपीठावर जास्तीत जास्त कंपन्यांना पोहोच देतो.
































































