शाहीन बागचा अलग ‘स्वॅग’, आंदोलनादरम्यान सुत जुळलं, 2 जोड्या विवाहबंधनात अडकणार

1060

नागरिकता सुधारणा कायदा (CAA) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC) विरोधात दिल्लीतील शाहीन बागमध्ये गेल्या दीड महिन्यापासून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी देशभरातुन लोक येत आहेत. आंदोलनामध्ये तरुणांची उपस्थिती लक्षणीय असून याचवेळी अनेकांच्या ताराही जुळल्याचे समोर आले आहे. आता आंदोलनादरम्यान सुत जुळलेल्या दोन जोड्यांनी विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला आहे.

केंद्र सरकारने लोकसभा आणि राज्यसभेमध्ये नागरिकता सुधारणा विधेय मंजूर केले. राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर याचे कायद्यात रुपांतर झाले. परंतु केंद्राच्या या निर्णयाविरोधात अनेक राज्यांमध्ये आंदोलन झाली. काही ठिकाणी हिंसाचार झाला, तर काही ठिकाणी ठिय्या आंदोलनं झाली. दिल्लीतील शाहीन बागमध्येही 15 डिसेंबरपासून सीएएविरोधात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात महिला, तरुणींसह युवावर्ग भाषण, मोर्चा आणि नाटकांद्वारे सीएएचा विरोध करत आहे.

#CAA शाहीन बाग आंदोलनाला ‘पीएफआय’कडून फंडिंग, ईडीचा धक्कादायक खुलासा

शाहीन बागमधील आंदोलनात तरुणांसह विद्यार्थीही मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, या आंदोलनामध्ये अनेकांची सुतही जुळली आहेत. यातील दोन जोड्यांनी विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला असून 7 आणि 8 फेब्रुवारीला ते निकाह करणार आहेत. विशेष म्हणजे दोन्ही जोड्यांचे कुटुंबीय एकमेकांच्या परिचयाचे असून त्यांनीही या नात्याला होकार दिला आहे.

वृत्तानुसार, आंदोलनादरम्यान मेडिकलचे शिक्षण घेणारे जुनैद आणि समर यांची ओळख झाली आणि ओळखीचे रुपांतर प्रेमामध्ये झाले. दोघांनीही याबाबत आपल्या कुटुंबीयांना माहिती दिली. कुटुंबीयांनीही याला होणार दिला असून 7 फेब्रुवारीला दोघांचा निकाह होणार आहे. तर दुसरी जोडी जिशान आणि आयशा यांची असून जुनैद आणि समरसारखेच यांचीही प्रेमप्रकरण आहे. आंदोलनादरम्यान जिशानने आयशाला लग्नाची गळ घातली आणि तिनेही होकार दिला. दोघांच्या कुटुंबीयांनीह या नात्याला संमती दिली असून 8 फेब्रुवारीला त्यांचा निकाह होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या