महालक्ष्मी मंदिरात शाकंभरी पौर्णिमा उत्सव

मुंबईतील श्री महालक्ष्मी मंदिर येथे शनिवारी शाकंभरी पौर्णिमेनिमित्त मंदिरांमध्ये विशेष पूजा व नैवेद्य अर्पण करण्यात आला तसेच नानाविध प्रकारची फळे, भाज्या व औषधी वनस्पतींच्या सजावटीचे आयोजन करण्यात आले होते. फळे, भाज्या व औषधी वनस्पतींच्या रूपाने जगाचे पोषण करणाऱया मातेचे या दिवशी भक्तगणांनी दर्शन घेतले.

अन्नाचा सन्मान, शेतकऱयाचा मान वर निसर्गाचे रक्षण याचे भान ठेवून मंदिरातील गुरुजींनी व भक्तगणांनी आरोग्य व समृद्धीची प्रार्थना केली. पौष पौर्णिमेला साजरी होणारी शाकंभरी पौर्णिमा ही देवी भगवतीच्या शापंभरी अवताराला अर्पण केलेली विशेष तिथी असते. धार्मिक श्रद्धेबरोबरच हा उत्सव निसर्गाविषयी आदर, अन्नधान्याचे महत्त्व आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीव करून देणारा असतो.