
मेकअप केल्यामुळे चीनमधील एका महिलेची शांघाय विमानतळावर चांगलीच फजिती झाल्याची घटना उघडकीस आली आहे. विमानाने प्रवास करणाऱया या महिलेने एकदम नवरीसारखा मेक केला होता. त्यामुळे विमानतळावरच्या फेस रेकग्निशन मशीनने या महिलेचा चेहरा ओळखण्यास नकार दिला. पासपोर्टवरचा चेहरा आणि मेकअप केल्याच्या चेहऱयामध्ये जमीन अस्मानचा फरक असल्याने मशीनने हा चेहरा ओळखला नाही. त्यामुळे महिलेला बराच वेळ त्या ठिकाणी ताटकळत उभे राहावे लागले. विमानतळावरील सुरक्षा अधिकाऱयांनी महिलेला मेकअप काढण्याची विनंती केली. कारण, मेकअप काढल्याशिवाय तिचा चेहरा मशीनपुढे जुळणे शक्य होत नव्हते. अखेर महिलेने सर्व मेकअप काढला. यानंतर जे महिलेचे खरे रूप समोर आले. ते पाहून, सर्वांनाचं धक्का बसला. परंतु महिलेला प्रवेश मिळाला.