पुन्हा ‘शांतीत क्रांती’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रेक्षक आणि समीक्षकांनी प्रशंसा केलेल्या ‘शांतीत क्रांती’चा दुसरा सिझन लवकरच येणार आहे. आत्मशोधाचा प्रवास आणि हास्याचा दुहेरी डोस देणारी ही प्रसन्न, दिनार आणि श्रेयसची गोष्ट आहे.

याबद्दल ललित प्रभाकर म्हणाला, ‘शांतीत क्रांती’ सिझन-1ला प्रेक्षकांकडून भरघोस प्रेम मिळाले. आता आम्ही नवीन सिझन घेऊन येत आहोत. हास्य, ट्विट्स, रोमांच यांनी भरलेल्या नवीन प्रवासाची आम्ही सुरुवात करत आहोत.

सीरिजचे दिग्दर्शन सारंग साठये व पौला मॅकग्लीन यांनी केले आहे. यामध्ये अभय महाजन, आलोक राजवडे, ललित प्रभाकर, मृण्मयी गोडबोले, प्रिया बॅनर्जी, प्रियदर्शिनी इंदलकर यांनी काम केले आहे. 13 ऑक्टोबरपासून ही सीरिज सोनी लिव्हवर येत आहे.