दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा काहीच संबंध नाही – शरद पवार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्लीत मागील काही दिवसांत घडलेल्या घडामोडींमुळे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांनी जोर धरला आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा काहीच संबंध नसल्याचे आज पुन्हा एकदा स्पष्ट केले.

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी दिल्लीत नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. त्यापाठोपाठ सुप्रिया सुळे यांनी कौटुंबिक कार्यक्रमाचे निमंत्रण देण्याच्या निमित्ताने पेंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याने राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत चर्चा सुरू झाल्या होत्या.

पार्थ पवार आणि प्रफुल्ल पटेल शरद पवारांना भेटले

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनीदेखील गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन जवळपास तासभर चर्चा केली. त्यातच पार्थ पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क वर्तविले जात आहेत.