
प्रत्येकाला आपापल्या क्षेत्रातील ‘लिजंड’सोबत काम करण्याचं स्वप्न असतं. आणि असं स्वप्न प्रत्यक्षात उतरलं की आनंदाला पारावार उरत नाही. चित्रपट क्षेत्रातही अशी स्वप्नं उराशी बाळगून अनेक जण बरीच वर्ष प्रयत्न करत असतात. ‘बाहुबली’ फेम प्रभास यानं देखील असं एक स्वप्न त्यानं उराशी बाळगलं होतं. शुक्रवारी केलेल्या एका पोस्टमध्ये, आता हे स्वप्न प्रत्यक्षात उतरत असल्याचं त्यानं म्हटलं आहे.
‘Finally, a dream coming true…
Sharing screen space with the legendary Amitabh Bachchan Sir !
#NamaskaramBigB’, असं लिहित प्रभासने आपल्या अधिकृत हँडलवरून व्हिडीओ पोस्ट केला आहे. महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत प्रभास लवकरच एका चित्रपटात दिसणार आहे. याची घोषणा या व्हिडीओतून करण्यात आली आहे.
हा व्हिडीओ ‘विजयंती मुव्हीज’चा आहे. या व्हिडीओत म्हंटले आहे की लिजंडरी कलाकाराशिवाय लिजंडरी फिल्म आम्ही कशी काय तयार करू शकणार आणि त्यानंतर महानायक बिग बी अमिताभ बच्चन यांच्या गाजलेल्या चित्रपटातील काही सीन झटपट झळकतात. त्यानंतर बच्चन यांचं नाव झळकतं. नाग अश्विन या हा चित्रपट आहे. ज्यामध्ये हिंदुस्थानाती सुपरस्टार्स एकत्र दिसणार आहेत.
अमिताभ बच्चन, प्रभास यांच्या जोडीला अभिनेत्री दीपिका पडुकोण या चित्रपटात झळकणार आहे. तासाभरातच 29 हजारांहून अधिक लाईक, 800 हून अधिक शेअर, दीड हजाराहून अधिक कमेंट्स आल्या आहेत.
हा चित्रपट कोणता आहे, कधी प्रदर्शित होणार याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.





























































