पॉर्न व्हिडीओ प्रकरण, अभिनेत्री शर्लिन चोप्राची अटकपूर्व जामीनासाठी हायकोर्टात धाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पॉर्न व्हिडीओची निर्मिती तसेच अश्लील चित्रीकरणात सहभाग घेतल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केलेली अभिनेत्री शर्लिन चोप्रा हिने हायकोर्टात धाव घेतली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अटक करू नये म्हणून शर्लिनने हायकोर्टात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला असून हायकोर्टाने तिला तूर्तास दिलासा दिला आहे. सोमवारपर्यंत पोलिसांनी शर्लिनवर कोणतीही कारवाई करू नये असे आदेश न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांनी दिले आहेत.

अभिनेत्री गेहना वसिष्ठने पॉर्न चित्रपट बनवून ते एका कंपनीला विकल्याचे प्रकरण ताजे असतानाच अभिनेत्री शर्लिन चोप्रानेही अश्लील व्हिडीओची निर्मिती केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. यूकेतील एका कंपनीने शर्लिन चोप्रा हिच्याशी अश्लील चित्रपट निर्मितीबाबत करार केला होता. पेड कंटेंट असलेल्या या चित्रपटाची पायरेटेड कॉपी निघाली. त्यामुळे अश्लील चित्रपटाची निर्मिती, दिग्दर्शन आणि त्यात अभिनय केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी आयटी कायद्यांतर्गत 6 नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी पोलिसांनी अटक करू नये म्हणून मुंबई उच्च न्यायालयात शर्लिनने अॅड. चरणजीत चंदरपाल यांच्यामार्फत अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला. या अर्जावर न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्यासमोर सुनावणी घेण्यात आली. हायकोर्टाने याचिकेची दखल घेत शर्लिनला तूर्तास दिलासा दिला व 22 फेब्रुवारीपर्यंत कारवाई न करण्याचे आदेश पोलिसांना देत सुनावणी तहपूब केली.